शरद नागदेवे,
नागपूर -कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर शहरातील इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय आणि शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष भेट व व्यस्थापनाची पाहणी केली. त्या नंतर विभागीय आयुक्त कार्यालय येथे सर्व अधिकार्यांची व विदर्भ डेली वृत्तपत्र असोशियेशन पदाधिकारी तसेच वृत्तपत्र वितरण करणारे हाकर्स प्रतिनिधि यांची आढावा बैठक घेतली. तद्दनंतर नागपुर उद्योग/कारख़ाने विषयक बैठक घेवून उदभवनाऱ्या अड़चनी व त्यावर उपाय योजना करणे करिता सम्बंधित अधिकारी यांना सूचना केल्या.या प्रसंगी खा.विकास म्हात्मे ,माजी खा.विजय दर्डा,माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, आयुक्त डॉ.संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला,मनपा आयुक्त तुकाराम मुंडे,अधिष्ठा सजल मित्रा,व कॉंग्रेस अनुसूचित विभागाचे समन्वयक राजेंद्र करवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.