कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव जगभरात थैमान घालत आहे….जगापुढे एकच प्रश्न या संकटातून मुक्त कसे होता येईल…लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित…

सगळं जग ठप्प झालंय. काहीच दिवसांपूर्वी लोकांनी गजबजलेली आणि घड्याळ्याच्या काट्यावर जगणाऱ्या शहरात शुकशुकाट झाला आहे. जगण्यावरच निर्बंध आलेयत…शाळा, कॉलेज, ऑफिस बंद, प्रवासावर निर्बंध, जमावाने एकत्र येण्यावर बंदी…काही ठिकाणी तर सारंच ‘लॉकडाऊन’सगळ्या जगाने या आजाराला तोंड द्यायला ही पावलं उचलली आहेत.पण हे सगळं संपणार कधी? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार?

कोरोना व्हायरसचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 440,386 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 184 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 19,753 वर पोहोचली आहे. तर त्यातून आजारातून बरे होणार्याची संख्या 112,032 आहे ही सर्व माहिती

https://www.worldometers.info/coronavirus/वेबसाइट वरुण घेण्यात आली आहे कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका चीन या देशाला बसला आहे.त्या पाठोपाठ ईटली,स्पेन, अमेरिका, जर्मनी, इराण, फ्रान्स, साऊथ कोरिया, स्वित्झर्लंड, यूके, नेदरलॅंड या सारखे देशाला ही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. सर्व जगापुढे एकच प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे या संकटातून कसे मुक्त होता येईल

भारतामध्ये कोरोना व्हायरस

भारतातील कोरोना रोगाच्या रुग्णांचा आकडा 606 आज नवीन भरती झालेले 70 म्हणजे एकूण 676 इतका आहे. भारतात एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिला मृत्यू दि.१२ मार्च २०२० रोजी कर्नाटक राज्यातल्या कलबुर्गी जिल्ह्यात ७६ वर्षाच्या वृद्धाचा झाला. दुसरा १३ मार्च २०२० रोजी दिल्लीतील एका वृद्ध महिलेचा झाला भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 418 वर पोहोचली

भारताचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचा आदेश

भारताचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उद्या म्हणजेच २२ मार्चला जनता कर्फ्यू लावली आहे कर्फ्यू म्हणजे अशी स्थिती ज्यात लोक केवळ घरातच राहतात. खूपच आणीबाणीची परिस्थिती आली तरच घराबाहेर पडतात. एखाद्या दंगलीच्या वेळी लोक रस्त्यावर येऊच नये म्हणून कर्फ्यू लावला जातो. परिस्थिती यामुळे नियंत्रणात येण्यास मदत होते. तसा हा आपणच आपल्यावर लादलेला कर्फ्यू आहे. हा जनता कर्फ्यू २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ९ पर्यंत लागू असणार आहे. या दरम्यान लोकांनी आपल्याला घरातच कोंडून घ्यायचं आहे. आपण संध्या. 5 वा. सायरनचा आवाज होईल. तेव्हा आपण दारात, खिडकीत, बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे आभार मानूया. टाळ्या वाजवून, घंटी वाजून आभार मानूया, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.हा जनता कर्फ्यू देशभर लागू करण्यात येणार आहे.

जनतेनी सरकारी कर्मचाऱ्यांविषयी आदराची भावना ठेऊन यात सहभाग घ्यावा असं मोदी म्हणाले आणि संपूर्ण भारतातून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.अनेक लोकांनी टाळ्याच्या गजरात तसेच थाळी नाद करून डॉकटर,नर्स,पोलीस, सफाई कर्मचारी, शासकीय अधिकारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे, आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी,ज्यांनी, अव्याहतपणे जनतेची सेवा केली अश्या सर्वाना शतशः प्रणाम व मन: पूर्वक हार्दिक आभार आम्हाला अभिमान आहे …आम्ही भारतीय आहोत…आणि आम्ही या कोरोना सारख्या संकटा वर आम्ही विजय मिळवू परंतु दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे

संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश १४ एप्रिल पर्यंत म्हणजेच २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला राज्याच्या सीमा देखील सील करण्यात आल्या.
महाराष्ट्र सरकारने देखील जिल्ह्याच्या सीमा देखील सील करण्यात आल्या.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे

कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना वेदना, अनुनासिक रक्तसंचय, वाहणारे नाक, घसा खवखवणे किंवा अतिसार होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे वाटत नाही.बहुतेक लोक (सुमारे ८०%) विशेष उपचार न घेता या आजारातून बरे होतात. कोरोना होणार्‍या प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा उपचार या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.
दृष्टोत्पत्तीस आलेल्या लक्षणांवर लाक्षणिक उपाययोजना करतात.

गंभीर अवस्थेत रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.
बाहेरून आल्यावर नेहमी आपले हाथ स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

अर्थव्यवस्थेला हादरा

आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाकडे पाहणे महत्वाचे आहेच पण या वायरसचे अर्थकारणावर होणारे परिणाम ही अतिशय तीव्र आहेत. या आजारामुळे जागतिक अर्थव्यस्थेवर होणारा परिणाम आता स्थानिक पातळीवर ठळकपणे दिसू लागलाय. जागतिक व्यापाराची पुरवठा साखळीच (सप्लाय चेन) विस्कळीत करुन या विषाणूने जागतिक अर्थव्यवस्थेला जेरीस आणले, असेच म्हणावे लागेल. सुमारे १५ अब्ज डॉलर्सचा फटका केवळ कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसलाय आणि यापुढेही तो वाढतच जाणार आहे.

तेल उत्पादक (OPEC) देश, रशिया व अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या तेलयुद्धाचा अन्य देशांना फायदा होईल की नाही आणि तो ग्राहकांपर्यंत पोचेल की नाही हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे. या देशांतील व्यापार युद्धामुळे आणि एकूणच मंदीमुळे तेलाची मागणी मात्र कमी झाल्याने सरकारने ठरवले तर त्याचा फायदा आपल्यासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांना होऊ शकतो. इंटरनेट व तंत्रज्ञानामुळे व्यावसायिकदृष्ट्या जग हे खूप छोटे झाले आहे. विकसित देशांना सेवा पुरवणाऱ्या आयटी कंपन्यांची जागतिक पातळीवरची देवघेव इतकी वाढली आहे की एका देशातील उद्योग बंद पडताच दुसऱ्या देशाला त्याचा लगेच फटका बसतो.

देशातील वाहन उद्योगही अडचणीत आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या गाड्यांचे सुटे भाग व औषधांसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने त्याचा औषध व वाहन उद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे. आपल्याकडील पर्यटन व वाहतूक क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आहे. तीर्थक्षेत्रे, खाण्याच्या जागा, शॉपिंग मॉल तसेच गर्दीच्या जागा ओस पडताना दिसतात.

कृषी क्षेत्रालाही मोठा फटका या कोरोनामुळे बसला आहे. कांद्याला मिळणारा भाव कमी होत असताना पालेभाज्या आणि फळांची मागणीही घटलीय. देशातून मासे आणि कोळंबीचीही मोठ्या प्रमाणात निर्यात होते. कोरोनासंदर्भात पसरलेल्या अफवांचा सर्वांत मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसलाय. या व्यवसायाला दरमहा तब्बल ४०० कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागतोय. चिकनचा भाव अगदी १० रु. प्रती किलोपर्यंत खाली आला तर पोल्ट्रीशी संबंधित इतर पूरक उद्योगांवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. खाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी खरेदी थांबवल्यामुळे मका व सोयाबीन सारखी पिके घेणारे शेतकरीही अडचणीत आले आहेत. केवळ महाराष्ट्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पोल्ट्री व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे १० लाख लोकांना याची झळ सोसावी लागत आहे. देशाला वाचवणाऱ्या कृषी क्षेत्राला बसणारा फटका लक्षात घेऊन दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान घडवून आणणाऱ्या पोल्ट्री सारख्या अनेक उद्योगांसाठी सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
मंदिरे आणि पर्यटन याला सर्वाधिक फटका

भारतातील अनेक महत्वाची मंदिरे तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा, शनी मंदिर,पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच मीनाक्षी मंदिर, बनारस काशीचे महादेव मंदिर, अमृतसर येथील गुरू नानक गुरुद्वारा, तसेच गजानन महाराज मंदिर भूतो ना भविष्यते असे कधी होईल हे स्वप्नात पण विचार केला नव्हता अशी मंदिरे देखील बंद करावी लागली
भारतातील ताजमहाल, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, गेट वे ऑफ़ इंडिया, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हम्पी, उटी, म्हैसूर महल गोवा मधील मनमोहक चर्च, तेथील समुद्र किनारे, केरळ मधील समुद्र किनारे, असे कितीतरी मंदिरे आणि पर्यटन ठिकाणे कोरोनाचा शिकार झाली आहेत. म्हणजे तिथे पर्यटनाला खीळ बसली आहे. मंदिरे ओस पडत आहेत. यात्रे करू मध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण जगावर थैमान घातले आहे. जगापुढे एकच प्रश्न आहे तो म्हणजे या संकटातून मुक्त कसे होता येईल

निर्यातीला फटका

कोरोनाचा पहिला फटका बसला तो निर्यातीला. अनेक देशांची निर्यात ठप्प झाली आहे. आपल्याकडील आंबा, द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांपासून तर व्यापाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून तर उद्योजकांपर्यंत सगळेच हवालदिल झाले आहेत. ग्लोबल इकॉनॉमीमध्ये प्रत्येक देश सध्या दुसऱ्या देशावर अवलंबून आहे. त्यामुळे या प्रश्नाची दाहकता अधिक वाढते. अनेक उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. औषध कंपन्यांचीही तीच गत आहे. ई-कॉमर्समध्ये घटलेली मागणी व केवळ एक चालक बाधित झाल्याने कॅब कंपनीवर आलेले दडपण असंच चालू राहिल्यास येत्या काळात या गोष्टी भयावह स्वरूप धारण करतील अशी शक्यता आहे. कापड, यंत्रमाग, छोट्या-मोठ्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज, आयटी सर्व्हिसेस या सर्वच उद्योगांना त्याची जबर किंमत मोजावी लागू शकते.

असंघटित क्षेत्राला तडाखा
आपल्याकडे ९० टक्के नोकऱ्या या असंघटित क्षेत्रांत आहेत. अगदी रिक्षावाला, हातगाडीवाला, टॅक्सीवाले, रस्त्यावरचे खेळणी विक्रेते, चहावाले यापासून तर वेटर, गॅरेजवाले, मॉल मधील तरुण-तरुणी, कागद-काच-भंगार-जमा करणारे, बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, अर्धकुशल, अकुशल कामगार अशा हातावर पोट असलेल्या लोकांच्या रोजगारावर कोरोनामुळे संक्रांत आली आहे. नोटबंदीच्या तडाख्याने घायाळ झालेल्या अर्थव्यवस्थेतील हे घटक आता कुठेतरी कसंबसं सावरत असताना अचानक कोरोनाचे संकट कोसळले. साधे चहाचे उदाहरण घेता येईल. देशाची लोकसंख्या १३० कोटीच्या घरात आहे. यापैकी अवघ्या एक कोटी लोकांनी जरी एका वेळेस हॉटेलमध्ये चहा घेणे सोडले आणि दहा रुपयाला एक चहा याप्रमाणे हिशेब केला तर महिन्याला ३०० कोटी रुपयांचा फटका केवळ चहावाल्यांना बसणार आहे. त्यातही मुळातच हातावर पोट असलेल्या या वर्गाकडून बचत केली जात नाही. शिल्लक काही उरतच नसल्यामुळे बचत करणार तरी कशी? अशातच कोरोनाची स्थिती आणखी एक-दोन महिने कायम राहिली तर या वर्गाचं जगणं कठीण होणार आहे.

अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक कुटुंबं सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याज दराने पैसे घेऊन ते कर्जाच्या दुष्टचक्रात अडकण्याचीही शक्यता आहे. अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन वाहने खरेदी केली आहेत. पण कोरोनाचा वाहतूक क्षेत्रावरही परिणाम झाल्यामुळे भविष्यात वाहन कर्जाचा हप्ता थकल्यास बँकांचाही एनपीए वाढणार आहे. परिणामी त्याचा रिअल इस्टेट व इतर क्षेत्रामध्ये नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मल्टिप्लेक्स बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले तसेच नाट्यक्षेत्रातील कलाकार आणि पडद्यामागे काम करणारे कामगार यांच्या उत्पन्नावरही गदा येणार आहे. या सर्व बाबींकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

देशभरात बेकारी

सध्या राज्यात आणि एकूणच देशभरात बेकारीने कळस गाठला आहे. त्यातच कोरोनामुळे आणखी वाढ होण्याची भीती आहे. त्यामुळे याचाही लगेचच अभ्यास करुन कोणत्या उद्योगावर काय परिणाम होईल आणि त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचाही विचार करावा लागणार आहे. त्याची सुरुवात संवादापासून होऊ शकते. त्यासाठी छोटे, मध्यम व मोठ्या व्यवसायिकांशी आणि त्यांच्या संघटनांशी लगेचच चर्चा सुरु केली तर त्यावर लवकर मार्ग शोधून काढणे शक्य होईल.

आर्थिक मंदी
जग आर्थिक मंदीच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता असतानाच टॉम ओरिकसारखे जागतिक अर्थतज्ञ मात्र याला विकसनशील देशांसाठीची सुवर्णसंधी म्हणून पाहत आहेत. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी प्रगतीची दारे उघडणारा काळ म्हणूनही या रोगाकडे पाहिलं जातंय. कधी कधी वाईटातूनही चांगले घडत असते. त्याप्रमाणेच कोरोनाच्या संकटातून संधीही निर्माण होऊ शकतात. फक्त त्या शोधण्याची आणि त्याला मूर्त रूप देण्याचं व्हीजन आणि तत्परता राज्यकर्त्यांकडे असावी लागते. आपल्याकडील राज्यकर्ते तशी तत्परता दाखवतील, अशी आशा करायला हरकत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर चीनमध्ये कार्यरत असलेल्या किंवा आपल्या उद्योगाचा विस्तार चीनमध्ये करणाऱ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी एमआयडीसी आणि राज्य सरकारने वेळीच पावले उचलली पाहिजेत. यापूर्वीचा सार्स किंवा आताच्या कोरोनामुळे चीनमध्ये जाण्यास या कंपन्या धास्तावल्या आहेत. त्यांना आपल्याकडे आवश्यक त्या सुविधा निर्माण करुन दिल्या तर आपल्याकडची बेकारी कमी होऊन तरुणांच्या हातालाही काम मिळेल.
चीनपासून धास्तावलेल्या व पर्यायी उत्पन्नाच्या शोधात असणाऱ्या उद्योगांना भारत व विशेषतः महाराष्ट्र हा एक सुरक्षित पर्याय होऊ शकतो. यामुळे गलितगात्र झालेल्या आपल्या अर्थव्यवस्थेलाही नवसंजीवनी मिळू शकेल. पण त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन करसवलती व अन्य शक्य त्या उपाययोजना त्वरेने करणे आवश्यक आहे. तसेच अर्थतज्ञांची समिती नेमून येत्या काही वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्योगांवर होणाऱ्या अल्प व दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास करून वेळीच योग्य ती पावलेही उचलली पाहिजेत.

नवीन कार्यपद्धतीचा उदय
एकमेकांशी येणाऱ्या जवळच्या संबंधांमुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होतो. म्हणून राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, मॉल, थिएटर बंद केले आहेत. काही कंपन्यांनीही कार्यालयात न येता घरुन काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) मुभा दिली आहे. यातून एक नवी कार्यप्रणालीही उदयास येऊ शकते. याचा भविष्यात काय परिणाम होईल हे आताच सांगणे कठीण असले तरी अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम होईल, हे मात्र नक्की!शेवटी व्यक्तिगत स्वछता आणि आवश्यक ती दक्षता घेतली तर हा रोग नियंत्रणात राहील मात्र या रोगामुळे निर्माण झालेल्या अर्थसंकटातून देशाला सावरण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखणे, हाच एकमेव प्रभावी मार्ग ठरेल.

शब्दांकन : पत्रकार बाळासाहेब (बाळू) राऊत
मोबाईल नंबर : 7021249770

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here