कोरोना रोगाला देशातुन संपविण्यासाठी घरातच राहा…आनंदी राहा

बाळापुर  – प्रशासनाच्या आदेशा नुसार २१ दिवसाचा देशात लोकडाऊन व राज्यात संचारबंदी कायद्याचे पालन होत आहे सध्यातरी सर्व सामान्य कुटुंब आप आपल्या घरातच आहे प्रत्येक काही नवा किंवा जुना खेळ खेळत आहे काही बनवत आहेत आणि हे दिवस आनंदात घालवत आहे बाळापूर तालुक्यातील व्याळा गावातील सर्व साधारण कुटुंब अंभोरे या परिवारातील पेशाने एस टी महामंडळ मधिल कामगार महादेव अंभोरे व त्यांच्या सोबत असलेली ४ वर्षाची मुलगी भुमी सध्या घरातील वाया गेलेली लाकुड आपल्या परिवारात दैनंदिन जीवनात कामा पडले आशा वस्तू बनवत आहेत. त्यामध्ये सिंगल बेड,लाकडी पायदान,कपडे ठेवण्याचे .अशा प्रकारे आपला दिवस आनंदात घालवत आहेत लोकांनी सुध्दा काही तरी घरात बनवत राहावे आणि आपला वेळ घालवा. घरातच राहा पण घराच्या बाहेर पडु नका मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान व मा. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या सरकारचे आदेशाचे पालन करा आणी आनंदी राहा असा सल्ला सुध्दा या सर्व सामान्य कुटुंबातून दिला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here