कोरोना रोगाचा सामना करण्यासाठी, सर्वांनी काळजी घेणे गरजेचे माजी मंत्री विनायकराव पाटील.

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.

अहमदपुर .
कोरोनाचा प्रादुर्भावाने संपूर्ण जग हादरलेले असुन महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून मागील काही दिवसांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत . येत्या 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांसाठी देशात संचारबंदी आणि लॉक डाऊन करण्यात आले असून शेतमजूर आणि हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या अडचणीत वाढ झाली आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेच्या मदतीसाठी मोठे पॅकेज जाहीर केले आहे.
प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली असून मुंबई,पुणे , हैदराबाद व अन्य शहरातुन परराज्यातून आपल्या गावाकडेआलेल्या लोकांनी सर्व प्रथम संकोच न बाळगता आपली तपासणी करून घेणे गरजेचे आहे. प्रशासन व त्यामधील वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर ,नर्स, पोलिस अधिकारी व कर्मचारी हे सध्य परीस्थीतीत कोरोणाला रोखण्यासाठी जिवापाड मेहनत घेत आहेत.प्रशासन जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करने गरजेचे आहे.प्रशासकिय यंत्रणा जनते साठी सर्व उपाय योजना करण्यात दंग झाली आहे त्यासाठी आपणास माझी कळकळीची हातजोडून नम्रता पुर्वक विनंती की कोणीही घराबाहेर न निघता आप आपल्या घरी कुटुंबियांसह बसून कोरणाला हरवावे असे कळकळीचे अहवान अहमदपूर व चाकुर तालुक्यातील जनतेसह लातूर जिल्हा वाशियांना माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले आहे.
मराठवाड्यात सुदैवाने आतापर्यंत एकही कोरोणाग्रस्त रुग्ण सापडला नाही. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत संशयीत 42 जणांची कोरोणाची तपासणी करण्यात आली होती.सुदयैवाने त्या सर्व 42 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आपण सर्व जण जिल्ह्यातील जनता भाग्यवान आहोत.असे असलेतरी जनतेनी तंतोतंत काळजी घ्यावी कोणीही घाबरून जाऊ नये.प्रशासनाच्या वेळोवेळी दिलेल्या सुचणेचे काटेकोरपणे पालन करावे.असेही अहवान शेवटी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here