कोरोना नियंत्रणासाठी नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी देणार दोन महिन्याचे मानधन…

बिलोली
बिलोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मैथिली संतोष कुलकर्णी हे आपले दोन महिन्याचे मानधन कोरोना रोगाचा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी दिली आहे.
देशात व राज्यात कोरोना रोगाची साथ पसरली असून प्रशासन रात्रंदिवस जनतेच्या सेवेमध्ये आहे.

प्रशासनास आपलाही थोडाफार हातभार लागावा व प्रशासनास मदत व्हावी या उद्देशाने नेहमी समाज सेवेत तत्पर राहणाऱ्या कुलकर्णी दाम्पत्याने हा निर्णय घेतला असून आपले दोन महिन्याचे मानधन लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. मैथिली संतोष कुलकर्णी व माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर पालिकेने शहरातील नागरिकांना सॅनिटाईजरचे वाटप केले असून शहरातील सर्व प्रभागात अग्निशमनदलाच्या गाडीद्वारे स्वच्छता केली जात आहे.लवकरच डेटॉल साबणाचे वाटप नागरिकांना केले जाणार असल्याचे नगराध्यक्षा सौ मैथिली कुलकर्णी यांनी सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here