कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर धावले मदतीला सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत.

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचं नाही आजूबाजूच्या राज्यात देखील समाजप्रबोधनकार कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख प्रसिद्ध आहेत. सध्याच्या वास्तव परिस्थिती नुसार हास्याची झालर लावून कीर्तनातून समाजाचे प्रबोधन करून उपस्थितीच्या मनावर अधिराज्य गाजविणारे निवृत्ती महाराज यांना देखील टीकेचे धनी व्हावे लागले.

हा विनोद आहे का असे नेहमी म्हणणारे निवृत्ती महाराज सांगतात आरे मी बेंबीच्या देठा पासून ओरडत आहे आता तरी सुधारा असे नेहमी ते कीर्तनातून सांगत असतात
इंदुरीकर महाराज राज्यभर किर्तनाचे कार्यक्रम करून समाज प्रबोधनाचे काम करत असतात. आपल्या वेगळ्या शैलीमुळे इंदुरीकर घराघरात पोहचले आहेत.असं जरी असलं तरी इंदुरीकर महाराजांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

प्रबोधनकार इंदोरीकर महाराज देखील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम आणि गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. अनेकदा इंदुरीकर महाराजांनी आपत्तीच्या वेळी आपला हातभार लावत असतात.

मिळणाऱ्या पैशातून त्यांनी शाळा बांधली आहे तसंच अनेक निराधार मुलांच्या राहण्याची आणि शिक्षणाची जबाबदारी देखील इंदुरीकर महाराजांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here