रूपेश वनवे सह राजू कापसे,रामटेक/नागपूर
रामटेक तुमसर मार्गावर असलेल्या भंडारबोडी या गावात कोरोनाची मोठी दहशत पसरलेली असून प्रधानमंत्री मोदींच्या 21 दिवसाचे लॉकडाऊनची घोषणाही केली. त्यानंतर कोरोनाचा गावाच्या सिमेत येवू नये यासाठी हे गावच माझे संसार अशी भुमिका भंडारबोडी गावचे सरपंच प्रतीभा बबलु मडावी ग्रामसेवक परिक्षित बोराडे,ग्रां.पं सदस्य संतोष साकोरे यांनी घेत इतर गावातून येणार्या नागरिकांसाठी नो एंट्री घोषित करून .कोरोनाच्या दहशतीने लाँकडाँऊन करण्यात आलेले रामटेक तालूक्यातील भंडारबोडी हे गाव आहे.
सद्या कोरोनाच्या भीतीने भंडारबोडी येथील नागरिक दहशतीत आहेत. तेव्हा नागरिकांची दहशत लक्षात घेता गावच्या सरपंचाने गावातील लोकांची कमेटी स्थापन करुन गावात येणाऱ्या रस्त्यावर झाडे,लाकडे व काटेरी झुडूप आडवे टाकून गावाच्या चारही सीमा बंद केल्या आहेत. गावात जाण्यापूर्वी सूचना लिहाण्यात आल्या आहे बाहेरील लोकांना प्रवेश बंद
कोरोनाचा नियमांचे पालन करा,कोरोना गो, कोरोना मुळे गाव बंद, असे लिहिण्यात आले आहे.त्यामुळे गावातीलही नागरिक बाहेरच्या नागरिकांना गावात येऊ दिले जात नाही………
भंडारबोडी येथिल मुख्य मार्गावर लॉकडाऊन केल्यामुळे मा.जी सरपंच महेंद्र दिवटे यांनी टिका करीत सांगितले की मुख्य रस्ता लॉकडाऊन करणे चुकीचे असून स्वताचे वार्ड स्वताची परिवाराची काळजी घेऊन स्वतःला लाॕक करणे गरजेचे असून रस्तावर निघु नये असे त्यांनी सांगितले आहे…