कोरची तालुक्यात नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या…

गडचिरोली:30 मार्च

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.२९) रात्री कोरची तालुक्यातील नवेझरी येथील एका इसमाची हत्या केली. हिरालाल रामसाय कल्लो(४०) असे मृत इसमाचे नाव असून, ते नवेझरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते. रात्री काही नक्षली गावात आले होते.

त्यांनी हिरालालला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. आज सकाळी गावकऱ्यांना हिरालालचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी नक्षल्यांनी पत्रकही टाकले होते. त्यात हिरालाल पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. हे कृत्य कोरची दलमने केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here