कोतवाल संघटने तर्फे दोन दिवसाचे वेतन…

चिमुर सुनील कोडापे
चिमूर तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे या लढ्यात महाराष्ट्र्र सरकारने खम्बीर पणे लढत आहे या लढ्यात सर्वसामान्य जनताही उतरली असून मुखमंत्री अर्थ सहायय निधीत सरकारी निमसरकारी व जनता आपापल्या परीने मदत देण्यात येत आहे.

यासाठी चिमूर तालुक्यातील कोतवाल संघटना ही पुढे सरसावली असून आपल्या पगारातील दोन दिवसाचे वेतन देण्याचा निश्चय केला आहे मासिक पगारातून दोन दिवसाचे वेतन कपात करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार संजय नागटीडक यांना देण्यात आले आहे निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रमोद गजभे विनोद रामटेके आकाश चौधरी ईश्वर बारेकर अंकुश ढोणे नागसेन वाघमारे राहुल सोनटक्के कैलास देठे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here