देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तो प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सध्या राज्यासह देशात 21 दिवसाचा लाँकडावुन आहे. यासाठी प्रशासनाने जनतेला आव्हान केले आहे की कोणत्याही नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळून कारणाशिवाय विनाकारण बाहेर पडु नये .या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रशासन, डाँक्टर आणि पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवर कार्य करीत आहेत.
या त्यांच्या कार्याला देशातील जनतेने प्रतिसाद देणे गरजेचे आहे. आणि एकत्रित धार्मिक कार्यक्रम सध्या स्थितीत बंद ठेवले पाहिजे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोगनोळी ता.निपाणी, जिल्हा.बेळगाव येथील मुस्लीम समाजाने निपाणी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे कोगनोळी मधील दोन्ही मशिदीमध्ये सार्वजनिक नमाज पडण्याचा कार्यक्रम लाँकडावुन संपेपर्यंत बंद केले आहे.
यापुढे लाँकडावुन संपेपर्यंत कोगनोळी तील मुस्लीम बांधव आपल्या नियमानुसार आपल्या घरात नमाज पडणार आहे. अशी माहिती मुस्लीम बांधवांनी दिली आहे.