कारधा पोलीस कर्मचारी पोहचले जीवनावश्यक वस्तूंसह गरजूंच्या घरी…अंन्सारी मित्र परिवारानेही जोपासले सामाजिक दायित्व

भंडारा : कोरोनाचा वाढता प्रभाव बघता त्याला नियंत्रित करण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन करधा पोलिसांनी पुढाकार घेत १२ गावातील ४०० कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. यात त्यांना अन्सारी मित्र परिवाराची वखण्याजोगी मदत आहे.

◆ समाजमन आणि सामाजिकभान जोपासणारे कारधाचे ठाणेदार श्रीराम लांबडे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू कऱ्हाडे यांनी लॉकडाऊनचा फटका बसलेल्या कुटुंबाला सहकार्य करण्याचे ठरविले. यावर त्यांनी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या अकबर अन्सारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कारधा पोलीस आणि अन्सारी मित्र परिवाराच्या सहकार्यातून भंडारा तालुक्यातील १२ गावातील ४०० च्यावर कुटुंबातील सदस्यांना तांदूळ, तेल, मीठ, तिखट, साखर, दाळ यासह जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

◆ गरजू कुटुंबाला मदत मिळावी यासाठी कारधा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णु कऱ्हाळे, मकसुद अन्सारी, शरवर अंन्सारी, कारधाचे सरपंच आरजु मेश्राम, अकबर अंन्सारी, सोनी गिल, करीमभाई, बिट जमादार चौधरी, पोलीस पाटील जगदिश लांजेवार, सचिन नेवारे, विशाखा तिरपुडे, शालु शिंदीमेश्राम, विनोद बांते यांनी मदत कार्यात सहकार्य केले. याचा लाभ कारधा, झबाडा, टेकेपार, बोरगांव, भिलेवाडा, गिरोला, सुरेवाडा, करचखेडा व उसरागोंदी, धारगांव येथील गरजू, निराधार, अपंग व बाहेर राज्यातील ४०० च्यावर कुटुंबातील सदस्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले आहे. काही ठिकाणी साहित्य वाटपासोबत आर्थिक मदतही करण्यात आली.

◆ समाजातील काही लोकांची परिस्तिथी अजूनही दयनीय आहे. गरीबांची मदत करण्यासाठी चांगल्या मनस्थितीची गरज आहे. गरीबांच्या चेहऱ्यावरील आनंद हे सर्वोच्च समाधान असते, अशी प्रतिक्रिया कारधाचे पोलीस उपनिरीक्षक विष्णु कऱ्हाळे यांनी दिली.

◆ सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तीकडून अशा गोरगरीब, निराधार, अपंग लोकांसाठी मदतीचे हात पुढे यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता अकबर अंन्सारी यांनी केले.
वितरण कार्यक्रमाला गिरीश बोरकर, जाधव, भोंगाडे, खडसे, रणदिवे, बब्लुभाई, नैयाज अंन्सारी, साहिद अंन्सारी व मित्र परिवार यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here