उपसरपंच व सदस्याने केली स्व: खर्चाने केली फवारणी…! नागरीकांनी केली प्रशंसा..

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.

हडोळती – गावामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हडोळ्ती गावचे उपसरपंच रविराज निजवंते व संजय मिरजगावे स्वखर्चाने गावामध्ये टॅक्टरद्वारे फवारणी केली गावातील प्रत्येक वॉर्डमध्ये , गल्लीबोळात , चौका चौकामध्ये आपण समाजाचे कांही देणे लागतो आपले कर्तव्य पालन करून ते स्वखर्चातून स्वतः फवारणी करत आहेत त्याचे गावामध्ये कौतुक होत आहे.

सध्या कोरोणाच्या संसर्गामुळे संपूर्ण जगामध्ये थैमान घातले आहे त्यामुळे उपाययोजना राबविल्या जात आहेत हडोळती हे मोठे गाव ग्राम पंचायत मध्ये १७ सदस्य असलेल्या या गावात करोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी आदेश लागू केला आहे त्याच अनुशंगाने या विषानुचा फैलाव होऊ नये म्हणून कोणाच्या मदतीची उपेक्षा न करता उपसरपंच निजवंते यांनी स्वतः टॅक्टर चालवून व सदस्य मिरजगावे यांनी हातात स्प्रे घेऊन गावामध्ये फवारणी केली

या दोघांनी राबवलेल्या उपक्रमाचे केले जात आहे राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत असून शासनाचा आदेशाचे पालन गावकऱ्यांनी करून विनाकारण घराबाहेर पडू नये असे मार्गदर्शन गावकऱ्यांना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here