उद्या राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत साधणार संवाद…

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई. – राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील आढावा घेण्यासाठी उद्या सकाळी 11:00 वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक होणार आहे.

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्यातील 13 विद्यापीठांचे कुलगुरू, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने सहभागी होणार आहेत.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन, ऑनलाईन अध्यापन प्रणालीचा वापर यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा वेळापत्रकासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here