आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने २ एप्रिल पासुन श्रीराम धान्‍य प्रसादाचे होणार वितरण…

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने श्री रामनवमीच्‍या शुभ मुहूर्तावर बल्‍लारपुर विधानसभा क्षेत्रात दहा हजार गरजु व गरीब कुटूंबांना श्रीराम धान्‍य प्रसादाचे वितरण करण्‍यात येणार आहे. या श्रीराम धान्‍य प्रसादात 13 जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किटचा समावेश आहे.

कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर 14 एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन घोषित करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे गरीब व गरजु नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हातावर पोट घेवुन जगणा-या अशा गरीब व गरजू नागरिकांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या माध्‍यमातुन जीवनावश्‍यक वस्‍तुंची किट वितरीत करण्‍यात येणार आहे. यात आटा (गव्‍हाची कणीक), तांदुळ, बेसण, तेल, मीठ, मिर्ची, हळद, पारले बिस्‍कीट, साखर, चहापत्‍ती, डेटॉल, बटाटे व कांदे या वस्‍तुंचा समावेश राहणार आहे.

दि. 2 एप्रिल रोजी श्री रामनवमीच्‍या शुभ मुहूर्तावर बल्‍लारपुर येथील राम मंदिरात भाजपाचे दोन पदाधिकारी या श्रीराम धान्‍य प्रसादाची पुजा करतील व या जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किटच्‍या वितरणाला प्रारंभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here