आपातग्रस्त लोकांना पत्रकार संघाची मदत…”व्याहाड खुर्द ,व्याहाड बुज परीसरात अन्नधान्य वाटप…महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम…

(सावली) देशभर कोरोना विषाणू स़सर्ग जन्य रोगाबद्दल संचार बंदी करण्यात आली ,२१ दिवस ही संचारबंदी आहे ,पण या संचारबंदी लागू करण्यापूर्वी अनेक कामगार ,मजुर कामानिमित्त परप्रांतात, ईतर जिल्ह्यात कामाला गेले आणि तिथेच अडुन आहेत.

सावली तालुक्यातील अनेक गावांत बाहेर जिल्ह्यातुन कामानिमित्त येणारे मजुर कामगार आहेत अशांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका सावली च्या वतीने अन्नधान्य म्हणुन जिवनावश्यक वस्तू ,तेल पाकिट, तिखट, मीठ ,दाळ , साबण आदी वस्तूंची किट देण्यात आली.

यावेळी महाराष्ट् राज्य मराठी पत्रकार स़घाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे, जिल्हा अध्यक्ष चंदपुर सुनील बोकडे, कार्याध्यक्ष राजू कुकडे , सोबतच सावली तालुका म.रा.म.पत्रकार संघाचे अध्यक्ष होमदेव तुम्मेवार ,सचीव बाबा मेश्राम, सदस्य योगेश रामटेके , लोकमत दुधे , मोरेश्वर उधोजवर , उपाध्यक्ष डॉ प्रमोद सोनवणे,रेवण घेर,मंगेश सहरे तसेच दीपक गड्डेवर ,देविदास बांबोले ,कवडू मेश्राम आणि गावातील नागरिक उपस्थित होते,

मुख्यालयातील ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे पासून नाठजोगी भटकी समाज रोजगाराच्या माध्यमातून तालुका परिसरात येत असतो ,यंदाही सावली परिसरात व्याहाड खुर्द ,व्याहाद बुज या ठिकानी आले असता नुकतेच कोरोन चे ग्रहण लागले आणि त्यावर आपडकलीन संकट निर्माण झाले याची गंभीर दखल घेत त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून

पत्रकार संघाचे वतीने 150 कुटुंबांना अन्नधान्य वितरण करण्यात आले तशीच कोरोना संदर्भात जागृती करण्यात आली
पत्रकार संघाच्या या उपक्रमात अनेकांनी आभार व्यक्त केले , माणसांच्या संकट काळात केवळ माणूसच धाऊन जातो. ,घरात बसून ताठ,वाठी थापुळ्या मारण्यापेक्षा विज्ञानाची कास धरा.

असाही संदेश देण्यात आला कारण माणूस हा नैसर्गिक अन्नसाखडीचा एक भाग आहे त्या मुळे नैसर्गिक आपत्तीचे येणे जाणे हा एक नैसर्गिक चक्राचा एक भाग आहे म्हणूनच अशा संकटसमयी धाऊन जाणे हा माणुसकीचा धर्म आहे ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here