आणि बसस्थानकावर लागला भाजीबाजार…किराणा व भाजीबाजारासाठी सायं.४ ते ७ ची वेळ…

राजू कापसे,रामटेक

रामटेक -आजपासून रामटेकचे बसस्थानक भाजीबाजारात बदलले.सायंकाळी ४ वाजतापासून येथे जीवनावश्यक भाजीपाला विकत मिळू लागला.सुपरमार्केट येथे होणारी गर्दी त्यामुळे शहराच्या सात भागात विखुरल्या गेल्याने शहरवासी आणि प्रशासनाची चिंता थोडी कमी झाली.r
रामटेक यैथील बसस्थानकासह शहराच्या सुपर मार्केट,लंबे हनुमान मंदिर ,पोलीस क्वाॅर्टर्स,बर्वे प्राथमिक शाळा,कालंका मंदिर व रामतलाई येथे आजपासून भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला.कोरोना विषाणू समन्वय समितीद्वारे हा निर्णय घेण्यात आला.जनतेनेही त्याला उत्तम प्रतिसाद दिला.किराणा सामान खरेदी करण्याचीही वेळ सायं.४ ते ७ अशीच ठेवण्यात आल्याने व कुटूंबातील एकाच व्यक्तीला येण्याची परवानगी असल्याने गर्दीवर नियंत्रण आले.त्यातही दुकानांसमोर ग्राहकांना सुरक्षित अंतरावर उभे राहण्यासाठी चौकोन आखण्यात आले असल्याने फारच सोयीचे झाले.आज सकाळपासून लाॅकडाऊन काळात रस्त्यांवरील वर्दळ थांबली.अत्यावश्यक कामालाच बाहेर पडणारांशिवाय थातुरमातुर कारणांसाठी बाहेर पडणारांची संख्या नगण्य ठरली.त्यामुळे पोलिसांनाही थोडी उसंत मिळाली.
शेतकर्‍यांना शेतातील गहू ,हरभरा यासारखी पिके कापणीसाठी ,मळणीसाठी परवानगी मिळाल्याने शैतकर्‍यांचा जीव भांड्यात पडला.५ पेक्षा कमी मजूर असल्याच्या अटीचीही पुर्तता झाल्याने प्रशासनालाही सोयीचे झाले.मात्र गुरुवारी पहाटे दोन तास धो धो पाऊस बरसल्याने शैतातील गव्हाची गुणवत्ता घसरली.गहू काळपटला.उभा असलेला गहू झोपला.त्यामुळे शैतकर्‍यांचे नुकसान झाले.नुकसानीचे पंचनामे होतील काय ?याची विवंचना शेतकर्‍यांना चिंताग्रस्त करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here