यवतमाळ, दि.27 : कोरोना विषाणू (कोव्हिड – 19) संसर्गासंदर्भात गुरवारी दोन जणांचे नमुने निगेटिव्ह आले होते. यापैकी एकाला सुट्टी देण्यात आली होती तर एकाला लक्षणे असल्यामुळे विलगीकरण कक्षातच ठेवण्यात आले होते. मात्र या नागरिकालाही आता सुट्टी देण्यात आली असून सद्यस्थितीत पॉझेटिव्ह नमुने असलेले तीन नागरिक विलगीकरण कक्षात दाखल आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे.
तर सुट्टी देण्यात आलेल्या नागरिकांना उपाययोजना म्हणून गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
तर गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 88 आहे. या नागरिकांची आरोग्य विभागाच्यावतीने नियमित तपासणी सुरू असून त्यांनीसुध्दा इतरांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.