आज पासून मोबाईल महागला…

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा, या माणसाच्या मूलभूत तीन गरजा आहेत. पण आज सगळ्यात महत्वाची गरज माणसाची झाली आहे ती मोबाईल आज थोडा वेळ मोबाईल नसेल तर माणूस बैचेन होतो. आता जीएसटी परिषदेच्या मार्चमध्ये झालेल्या बैठकीत मोबाइल किंमतीवरचा जीएसटी १२ वरुन १८ टक्के करण्यात आला आहे.

१ एप्रिलपासून या निर्णय अमलात आणला जाईल असं केंद्राने म्हटलं होतं. त्यामुळे आजपासून मोबाइल खरेदी करण्यासाठी जाल तर तो १८ टक्के जीएसटी देऊन घ्यावा लागणार आहे. त्यामुळे अर्थातच मोबाइलची किंमत वाढली जाणार आहे.
शोआमी इंडियाचे एम.डी. मनू कुमार यांनी ट्विटरवर शोआमी मोबाइलच्या किंमती आजपासून तातडीने वाढल्याचं जाहीर केलं आहे.

Xiaomi, Redmi, Poco या सगळ्या मोबाइलच्या किंमती वाढल्या आहेत. वाढलेल्या किंमती या फ्लिपकार्टवरही दाखवण्यात येत आहेत. POCO X 2 6GB+128GB हे मॉडेल आधी १६ हजार ९९९ रुपयांना मिळत होतं. जे आता १७ हजार ९९९ रुपयांना झालं आहे. त्याचप्रमाणे REDMI K20 6GB+64GB या मॉडेलची किंमतही २ हजार रुपयांनी वाढली आहे. अशाच प्रकारे इतर मोबाइलच्या किंमतीतही वाढ झाल्याचंही जैन यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here