अहमदपूर येथे “शिव भोजन थाळी” चे उद्घाटन…

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.

अहमदपुर – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा महत्वकांक्षी उपक्रम असलेल्या शिव भोजन थाळीला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे सुरुवातीला जिल्हा स्तरावर हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असताना तालुकास्तरावर शिव भोजन थाळी सुरु करण्यात आली असून अहमदपुर शहरात ” शिव भोजन थाळी चे रविवारी थोडगा रोड रेड्डी कॉम्लेक्स येथे शिव भोजन थाळीचे उदघाटन करण्यात आले.

शहरात सध्या कोरोनाचा पाश्र्वभूमीवर बाजारपेठ , हॉटेल व्यवसाय बंद आहेत गरीब व गरजू नागरिकांना अत्यल्प दरामध्ये जेवण मिळावे या उदेशाने शासनाने ही योजना सुरु केली कोरोनाचे संकट असताना गरीबाना अल्पदरामध्ये जेवण मिळणार आहे याचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी शेलार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यामध्ये पाच रुपये मध्ये थाळी मिळणार आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, शहर प्रमुख भारत सांगवीकर , उप. शहरप्रमुख राम जाधव, बाळासाहेब पडीले, माऊली देवकते, बाळू मद्देवाड, संतोष रोडगे, प्रदीप वट्टमवार , गुणाजी भगत, सदाशिव कराड, बालाजी काळे, सुभाष गुंडिले अदी शिवसैनिक उपस्थीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here