अशरफी तंजिमिया कमेटीच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप…भंडाऱ्यातील मुस्लिम बांधवांनी जोपासली सामाजिक बांधिलकी…

भंडारा : कोरोनामुळे भारतातील नागरिकांना खिळखिळे केले आहे. त्यापासून बचाव व्हावा म्हणून देशभरात लॉकडाऊन केले आहे. यामुळे हातावर कमवून पानावर खाणाऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत.

ही समस्या लक्षात घेऊन भंडारा शहरातील मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे. देशावरील संकटात मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या पुढाकाराने सर्वत्र कौतुक होत आहे.

◆ हाताला काम नसल्याने शहरातील मजुर आता गावाकडे परत निघाले आहे. हे सर्व आता गावाच्या दिशेने मिळेल त्या मार्गाने किंवा पायदळ देखील जातांना दिसून येत आहेत.
अश्यात भंडारा शहरात देखील मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा हाकणाऱ्या नागरिकांसमोर मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. परंतु संपूर्ण लॉकडाऊनमध्ये शहरील मोलमजुरी, घरकाम, बांधकाम, तसेच बेघर असलेल्या लोकांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची कश्या प्रकारे व्यवस्था करावी हा प्रश्न पुढे येत आहेत.

◆ सामाजिक बांधिलकी म्हणून भंडारा येथील तकीया वॉर्डातील असरफी तंजिमिया या सामाजिक युवकांच्या संघटनाने अश्याच मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्याच्या घरापर्यंत राशन व किराना सामान यात (तांदूळ, तुवर डाळ, कणिक, तेल, तिखट, हळद, मीठ) अशी एक किट वाटप केली आहे. यात आत्तापर्यंत आनंद नगर, अशरफी नगर, तकिया दरगाह परिसर, राजगोपालाचारी वॉर्ड, बेला या परिसरातील गरजूंना या जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप करण्यात आली आहे.

◆ गरजू लोकांचे नाव आपण या संघटनेकडे नोंद करू शकता सोबतच कुणाला गरजू लोकांना मदत करायची असल्यास संघटनेच्या सदस्यांशी 9404365959, 9970809915 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आव्हान करणयात आले आहे. हे मदत कार्य करणाऱ्यांमध्ये शाहिद अली, शोएब खान, जुनेद खान, रिजवान पठान, जाहिर मालाधारी, कलीम, अशरफी, आरिफ शेख, राशिद खत्री, शब्बीर भाई, ज़ाहिद अली, इकबाल खान, जावेद खान, सलमान आईफ़ाज़, मोहसिन अली, मुजाहिद अली, नाहिद परवेज, बाबू स्मगलर, इरफान शेख, सुनील बरपात्रे, विजय लाखडे, आबिद भाई, वाहिद बाबर यांचा समावेश असून ते भंडारा येथील तकीया वॉर्डातील आहेत. वाटप करण्यात असलेल्या जीवनावश्यक साहित्यात तांदूळ पाच किलो, कणिक दोन किलो, सोयाबीन तेल एक किलो, मसूर, चना, तुवर डाळ, हळद १०० ग्राम, तिखट २०० ग्राम, साखर एक किलो, चायपत्ती एक पाव आणि मीठ एक पॉकेट यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here