अन् तिथं माणुसकी अवतरली !…गाव वर्गणीतून नाथ समुदायाला वाटप केले धान्य…

भंडारा : लाखांदुर तालुक्यातील कोदामेडी येथील नाथ बांधवांसाठी शिवभक्त ग्रुप पुयार व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने राशन वाटप करण्यात आले. त्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे तिथं अवतरली माणुसकी असा प्रत्यय बघायला मिळाला.

◆ लाखांदुर तालुक्यातील कोडमेडी हे विकासाच्या बाबतीत अतिशय मागे समजले आणि निर्वाशितांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात बहुतेक नाथ समाजाचे लोक राहतात. त्यांचा व्यवसाय गावावोवी फिरुन दक्षिणा जमा करणे व त्यातुन आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे. असे त्यांचे नित्याचेच काम आहे. परंतु मागील काही दिवसांपासून त्या समाजातील लोक पोट भरण्यासाठी बाहेर राज्यात व जिल्ह्याबाहेर गेले होते. आणि आता कोरोणाच्या भितीने सर्व कुटुंब दोन दिवसाअगोदर स्वगावी परतले. गावात परतल्यानंतर घरी अन्नाचा दाणा नसल्याने पहील्या दिवशी पाण्यावरच दिवस घालवला.

◆ अशातच तावशी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते विलास शेंडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांना ही बाब सांगितली व स्वतः सुद्धा गावातुन वर्गनी जमा केली. प्रकाश देशमुख, शिवभक्त मंडळाची टिम, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी सुद्धा आपल्या गावातुन वर्गणी जमा करून काही साहीत्य विकत घेतले. आणि कोदामेडी गावातील नाथ समाज बांधवांमध्ये प्रती व्यक्ती एक किलो गहु व एक तांदुळ असे जवळपास पाच कट्टे राशनचे वाटप केले. कोरोना रोगापासून बचाव करण्याकरिता आवश्यक माहिती दिली. यावेळी विलास शेंडे, प्रकाश देशमुख, ज्ञानदीप ढोरे, धर्मेंद्र राऊत, सौरभ राऊत, पंकज गेडाम, विजय राऊत सदस्य युवक काँग्रेस तथा शिवभक्त ग्रुपचे कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. गावकरी व तालुक्यात त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here