गणेश तळेकर – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या भारतात २१ दिवसाची संचार बंदी सुरु आहे.या काळात भारत अत्यंत कठीण प्रसंगातून जात असताना पंतप्रधानांनी आर्थिक मदतीसाठी देशवासियांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते,त्या आवाहनाला सुपरस्टार अक्षय कुमार याने साद देत मदतीचा हात पुढे केला.अक्षय कुमार याने तब्बल २५ कोटींची मदत पंतप्रधान रिलीफ फंडात देवून माणुसकी दर्शन दिले.
अक्षय कुमारने ट्विट करत सांगितलं आहे की, “आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी जे काही गरजेचं आहे ते सगळं केलं पाहिजे. मी माझ्याकडील २५ कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू…”.
https://twitter.com/narendramodi/status/1243861543185305603/photo/1