अकोला – राज्यात धुळीसाठी प्रसिद्ध असलेला अकोला आता बेशिस्तीसाठी सुद्धा नाव लौकिक होती की काय ? शिस्त लावण्यासाठी सर्वच उपाययोजना अपयशी ठरल्या मात्र अकोलकर सुधारायच नाव घेत नाही. वाहतूक पोलिसानी जमा केलेल्या वाहनांनी वाहतूक कार्यालय तुडुंब भरले असल्याने वाहतूक पोलिसांना येणारी वाहने ठेवायची कुठ हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात करोना बाधीत रूग्ण आता दररोज शेकडो च्या संख्येने सापडत आहेत, महाराष्ट्रात आज आकडा ८०० च्या घरात गेला आहे, मृत्यू पावणाऱ्या करोना बाधित रुग्णाची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे, शेजारच्या बुलडाणा, वाशीम, अमरावती जिल्ह्या मध्ये करोना बाधित रुग्ण आढळून येत आहे.
अकोला जिल्ह्यात अजूनतरी करोना चा शिरकाव दिसून येत नाही, अकोला शहर व जिल्हा करोना मुक्त रहावा म्हणून सर्व शासकीय यंत्रणा रात्र दिवस काम करीत आहे, करोना प्रादुर्भाव टाळण्या साठी गर्दी टाळणे व सोशल डिस्टन्स कायम ठेवणे हा एकमेव उपाय असल्याने त्या साठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस दक्ष आहे,
परंतु संचारबंदी असूनही जीवनावश्यक वस्तू व अतिआवश्यक रुग्णांना दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन बरेच नागरिक आपली वाहने रस्त्यावर आणतात, जवळच्या चौकात भाजी आणायला सुद्धा आपली वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करतात, ह्यांना चाप बसावा म्हणून शहर वाहतूक शाखेने कंबर कसली असून पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन शेळके आपल्या कर्मचाऱ्यां सह सकाळ पासून शहरातील वेगवेगळ्या चौकात धडक मोहीम राबवित असून दररोज विनाकारण फिरणारीदोनचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने शोधून वाहतूक कार्यलयात जमा करण्यात येतात,
1 एप्रिल पासून 350 वाहने वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आल्या मुळे कार्यालयाची जागा सुद्धा अपुरी पडत आहेत, ह्या साठी पुढील काळात शास्त्री स्टेडियम मैदानाचा सुद्धा वाहने लावण्यासाठी उपयोग केल्या जाणार आहे, अकोला जिल्हा करोना मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व विनाकारण आपली वाहने घेऊन रस्त्यावरील गर्दी वाढवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी अकोला शहरातील नागरिकांना केले आहे।