अंधेरीत एकाच कुटुंबातील १० जणांना ‘कोरोना’ची लागण !

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई, : मुंबईतील अंधेरीत एकाच कुटुंबातील १० जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसात या १० जणांचे ‘कोरोना’चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकाच कुटुंबातील अनेकांना होणारा संसर्ग मुंबईकरांची धाकधूक वाढवणारा आहे.

दहा जणांचं कुटुंब दोन रुग्णालयात विभागून दाखल झालं आहे. पाच जण मरोळच्या सेवन हिल्स हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत, तर पाच जण विलेपार्ल्यातील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

एकाच रुग्णालयात जागा न मिळाल्याने कुटुंबाला दोन हॉस्पिटल्स गाठावी लागली.
दहा जणांच्या कुटुंबात २१ वर्षांच्या तरुणीसह तिघा वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. या कुटुंबाने सुरतमध्ये एका लग्नाला हजेरी लावली होती, तिथून संसर्ग झाला असेल, अशी शक्यता कुटुंबीयांनी दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here